Tuesday, October 11, 2016

"फॉरेनी"





"फॉरेनी" 

A Love with Foreigners Women 


It tells about the love between a foreign woman and an Indian man



A Love with Foreigners Women 

. 
तुझ्या इंग्लिश मनाला, 
मराठी फोडणी देतो.. 
तुझ्या जिन्स टॉपसाठी, 
सुंदर ओढणी घेतो..
.
गोऱ्या चिट्ट्या रंगात,
काळा रंग माझा मिसळतो..
येना गं तुलाही या गंधात,
एकदा शेती मातीत घुसळतो..
.
तू असेना रेखीव फॉरेनी,
मी मातीचा पठ्ठ्या आहे..
इंग्लिश मराठी गप्पा आपल्या
थोड्या गोड खट्ट्या आहे..
.
माय डियर बोलतेस
तेव्हा जिव उड्या मारतो..
ये शिवाराच्या बांधावर
ठेचा भाकर गोडीने चारतो...
.
लिव्ह इन रिलेशनमधे राहण्यापेक्षा,
तू सामिल हो माझ्या रुढींमध्ये..
लग्नाचा वेगळाच आनंद आहे
हरवून जाशील इथल्या गुढींमध्ये...
.
.. .. मदि. भिलारे
दि. 11'10'2016
तिच्या रुमालावर #तिच्या_रुमालावर Ticya rumalavar