ऋणानुबंध
Debt agreement in love
Here the husband and wife are sitting on the bike and recording their feelings about each other
![]() |
| Debt agreement in love |
दुरुनच जवळचं असं ....
.
आजूनही गाडीवर बसतेस परख्या सारखीचं..
माझ्या मनाला मात्र भासतेस नव्या नवरी सारखीचं....
बाजारात चालतानाही तुझी पावलं
माझ्या मागे अपसुक पडतात...
वाहतेस नेहमी माझ्या प्रवाहात....
.
दहा बाय दहाच्या , आठ माणसांच्या खोलीत साध खुणावता येत नाही तिथं मोकळे पणानं वावरणार, बोलणार तरी कशी म्हणा...
पण कधी करडी नजर, कधी ओलावलेल्या डोळ्यांच्या कडा,,,कधी मिश्कीलतेने, कधी विस्पारून पहाणारे डोळे सारं काही बोलून जातात,,,
अन् तु मात्र राहतेस अबोलचं...
...
असो ...!
गाडीबर बसताना तु चुकून जरी खांद्यावर हात ठेवलास तरी खुप मोठा आधार वाटतो...
वाटतं आता मी कोणतीही लढाई लढू शकतो...
हारनं जिंकन हा सारा नंतरचा भाग ...
पण दहा हत्तींच बळ नक्की येतं...
.
तु कदाचित दूर रहात असशील लाजून...
तुझ्या स्पर्शाने मन शहारतं....
अलगद हळवं हास्य चेहऱ्यावर उमटतं...
ते पाहून समोरच्या मुलीही लाजतातं...
आणि त्यांच्या लाजण्यातही तूच दिसतेसं...
.
तुझा अबोला किंवा तुझा न होणारा मोरपंखी स्पर्श सुद्धा मनाला हवा हवासा होतो...
तु नसताना गाडी ही नाराज होते माझ्यावर अधूनमधून ....
.
एकाकी एकांतही आता छळतो मला,
तु असणंच माझ्यासाठी खूप आहे.....
तुझं दूर रहान परवडत नाही मला,
तु आहेस हे माझ्या जगण्याचं स्वरुप आहे...... ..... ....!
.
........ मनोज भिलारे
(तिच्या रुमालावर)
