Saturday, December 10, 2016

खूप काम करावस वाटतं..

he want to do lot of work
..... . खूप काम करावस वाटतं . ........ 

Why, he wants to work so hard? Just for his partner ... talking about it
.



खूप काम करावस वाटतं
जेव्हा तुझ्या मनात प्रेम दाटतं॥धृ॥
.
मी येतो थकून भागून
तू घेतेस बाहूपाशात जागून
तेव्हा मला तुझ्यासाठी काम करावस वाटतं॥१॥
.
तुला माहीत असून ही तु पुसतेस जेव्हा
'कधी येणार ?' डोळा पाणी साठतं, तेव्हा
त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी काम करावस वाटतं ॥२॥
.
तुला हवं नको ते सगळं देण्यासाठी
मी न वाहीलेली माझी काळजी वाहणा-यांसाठी
तुझ्या डब्यासाठी काम करावस वाटतं ॥३॥
.
जास्त वेळ तुझ्या सोबत राहून दुःखविण्या पेक्षा
एकमेकांवर वाद-विवादात त्रागा होण्यापेक्षा
तुझ्या चेह-यावरच्या हास्यासाठी काम करावस वाटतं ॥४॥
.
....मदि. भिलारे
(तिच्या रुमालावर)
दि. २१.०८.२०१५
He used to do a lot of work for his partner

No comments: